मोदींचं हस्तारक्षर पहायचंय ? साई मंदिराच्या भेट नोंदीत लिहिलेला अभिप्राय वाचा !

मोदींचं हस्तारक्षर पहायचंय ? साई मंदिराच्या भेट नोंदीत लिहिलेला अभिप्राय वाचा !

अहमदनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डी साईबाबाचं दर्शन घेतलं. गेली 3 दिवस शिर्डीमध्ये साईबाबांचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. आज या महोत्सवाची सांगत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत पार पडली. मंदिर भेटीनंतर नरेंद्र मोदींनी साई मंदिरात भेटनोंद वहीत आपला अभिप्राय नोंदवला आहे. हा अभिप्राय नोंदवल्यानंतर मोंदीनी या वहित आपली सही देखील केली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोंदींची सही आणि त्यांचं हस्ताक्षर कसं असेल याची उत्सुकता अनेकांना लागलेली होती. परंतु ती आज पूर्ण झाली असून मोदींनी केलेली सही आणि त्यांनी आपल्या हस्ताक्षरात नोंदवलेल्या अभिप्रायची फोटोकॉपी आमच्या हाती लागली आहे.

दरम्यान साई मंदिरात येऊन मनाला शांती आणि मोठा आंनंद मिळाला असून याठिकाणी सर्वधर्म समभाव पहायला मिळाला असल्याचा अभिप्राय मोदींनी दिला आहे. तसेच देशातील सर्व नागरिकांना सुख, शांती लाभो अशी मागणीही मोदींनी साईचरणी केली आहे.

 

COMMENTS