नवी दिल्ली – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आतापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. याबाबत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिनर पार्टीचं आयोजन केलं आहे. या पार्टीसाठी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या नेत्यांना निमंत्रण दिल आहे. या डिनरदरम्यान पंतप्रधान मोदी आगामी निवडणुकांबाबत मंथन करणार असल्याची माहिती आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि तीन राज्यांमध्ये यावर्षअखेरीस होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात पंतप्रधान मोदी भाजप नेते आणि आरएसएसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे ही डिनर पार्टी महत्वपूर्ण मानली जात असून पंतप्रधान मोदींच्या या डिनर पार्टीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान आजच्या या पार्टीला देशभरातील भाजप आणि आरएसएसच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित केलं आहे. मिशन लोकसभा 2019 रणनीति तयार करण्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण मानली जात असून ही अनौपचारिक बैठक असणार असल्याची माहिती आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी मागील वर्षीही डिनरचे आयोजन केले होते. त्यावेळी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी त्यांनी डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. यावर्षीही आगामी काळात होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज या पार्टीचं आयोजन केलं आहे.
COMMENTS