उत्तर प्रदेशातील चाहत्याने पाच मिनिटात काढले राज ठाकरेंचे पोट्रेट ! पहा व्हिडिओ

उत्तर प्रदेशातील चाहत्याने पाच मिनिटात काढले राज ठाकरेंचे पोट्रेट ! पहा व्हिडिओ

कानपूर – उत्तर प्रदेश मधील प्रसिद्ध चित्रकार आणि राज ठाकरे यांचे निस्सीम चाहते असणारे अमित वर्मा यांनी अवघ्या पाच मिनिटे पाच सेकंदात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच पोर्टेट बनविले आहे. त्याचा विडिओ त्यांनी त्यांच्या फेसबुक पेज वर अपलोड केला आहे. या कलाकृतीतून त्यांनी राज ठाकरे यांना  ५० व्या वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे आणि यूपी बिहारींविरोधा लढणा-या राज ठाकरे यांना यूपीमध्येही चाहते असल्याचं या निमित्तानं पहायला मिळालं आहे. कालही राज ठाकरे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी विविध प्रकारचे केक कापून केला होता. तर मुंबई आणि परिसरात पेट्रोल चार रुपये स्वःस्त देऊनही वाढदिवस साजरा केला होता.

COMMENTS