औरंगाबाद – एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. औरंगाबादमध्ये सोमवारी घेण्यात आलेल्या सभेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाजप सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रीपल तलाकवरुन त्यांनी मोदी सरकारवर टीका केली असून ट्रिपल तलाक दिला तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाणार आहे तसेच नवीन कायद्यात अस म्हटलं आहे की ट्रिपल तलाक म्हटलं तरी लग्न मोडणार नाही आणि ट्रिपल तलाक देणा-याला 3 वर्षाची शिक्षा होईल, जर तलाक होणार नाही तर मग शिक्षा कशी होईल असं म्हणत त्यांनी मोदी साहब गुजरात के भाभी क्या है? असा सवाल पंतप्रधान मोदींना केला आहे. तसेच जर मुस्लिम ट्रिपल तलाक देईल तर त्याला 3 वर्षांची शिक्षा आणि इतर कोणी तलाक घेईल तर त्याला 1 वर्षाची शिक्षा हे आमच्या फंडामेंटल राईटवर गदा आणत असल्याचंही त्यावेळी ओवैसी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी मोदी सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरण्याचा प्रयत्न केला आहे. निर्भया प्रकरणानंतर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल असं म्हटलं तरी बलात्काराचं प्रमाण कमी झालं नाही. 30 हजार कोटींचा टू जी घोटाळा झाला. सीबीआय चौकशी झाली त्यात एकालाही शिक्षा झाली नाही. मग ट्रिपल तलाकमध्ये काय होईल असंही ओवैसी यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी प्रसार माध्यमांवर टीका केली असून संध्याकाळी 9 ते 11 मोदी भजन केलं नाही तर सकाळी यांचं पोट साफ होत नसल्याची ओवैसींनी टीका केली आहे.
70 वर्षांपासून अनेक अन्याय केले तरी आम्ही सबर करत आहोत. मिस्टर मोदी ये मुल्क हमारे बाप का है असं वक्तव्यही ओवैसी यांनी केलं असून 4 टक्के राजपूत एकत्र आले तर एक सिनेमा रिलीज होऊ देत नाहीत. पंतप्रधान त्यावर एक कमिटी बसवतात. तुम्ही तर 14 टक्के आहात वेळ ओरडायची नाही काही करण्याची गरज असल्याचं आवाहनही त्यांनी मुस्लिमांना केलं आहे.
COMMENTS