पंतप्रधान मोदी देशात पहिल्या तर जगात तिस-या क्रमांकावर !

पंतप्रधान मोदी देशात पहिल्या तर जगात तिस-या क्रमांकावर !

नवी दिल्ली – देशातच नाही तर जगातही पंतप्रधान नरेंद्र मोदींची क्रेझ पहायला मिळत आहे.नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सर्व्हेनूसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिस-या स्थानावर आहेत. गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचं रॅकिंग जाहीर केलं आहे. या रॅकिंमध्ये नरेंद्र मोदींना तिस-या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी पाचव्या क्रमांकावर होते. तर या यादीत जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल पहिल्या क्रमांकावर असून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रां दुसऱ्या स्थानावर आहेत. तसेच भारताच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानाला मिळालेलं हे सर्वोत्तम रँकिंग असल्यामुळे ते देशात पहिल्या तर जगात तिस-या क्रमांकावर आहेत.

 

गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनलने 50 देशांचा  सर्व्हे केला असून या सर्व्हेमध्ये प्रत्येक देशातील नागरिकांचाही सहभाग घेण्यात आला होता. त्यानंतर ही यादी जाहीर केली असून या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे राष्ट्राध्यश्र शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा यांना मागे टाकलं आहे. 2015 साली या रँकिंगमध्ये बराक ओबामा पहिल्या स्थानावर तर मोदी पाचव्या स्थानावर होते.

जगातील टॉप टेन नेते  
1) अँजेला मर्कल (जर्मनी)
2) इमॅनुअल मॅक्रां (फ्रान्स)
3) नरेंद्र मोदी (भारत)
4) थेरेसा मे (इंग्लंड)
5) शी जिनपिंग (चीन)
6) व्लादिमीर पुतीन (रशिया)
7) सलमान बिन अब्दुलअझीज अल सौद (सौदी)
8) नेत्यानाहू (इस्रायल )
9) हसन रोहानी (इराण)
10) डोनाल्ड ट्रम्प ( अमेरिका)

 

COMMENTS