ठाणे : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी राज्यात विविध नेत्यांची चौकशी सुरू असल्याने राजकीय वातावरण चांगलेचे तापले आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत आहे. आता ईडीच्या रडारावर वसईचे आमदार आले असून त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
सध्या राज्यात ईडीच्या कारवाईमुळे अनेक नेत्यांच्या धाबे दणाणले आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक अशी एका एका नेत्यांची चौकशी सुरू असताना आणखी एका आमदाराचे नाव समोर आले आहे. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची वसई-विरार भागात छापेमारी सुरू आहे. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने ही धाड टाकली आहे. वसई, विरार आणि पालघरमधील पाच ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे.
ईडीने या प्रकरणी या भागातील प्रसिद्ध विवा ग्रुपच्या विविध कार्यालयांमध्ये छापेमारी केली आहे. याव्यतिरिक्त इतरही काही ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. अद्यापही ही छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. महत्त्वाचे म्हणजे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर यांचा हा विवा ग्रुप आहे. त्यामुळे या छापेमारीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या छापेमारीनंतर ठाकुर कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS