राजकोट – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंजावती प्रचार दौरा सुरू आहे. त्यांची एक सभा आज राजकोटमध्ये आहे. मात्र या सभेबाबत राज्यातील भाजपचे नेते चांगलेच चिंतेत पडलेत. त्याला कारणही तसंच आहे. पंतप्रधानांची सभा ज्या ठिकणी आहे. त्याच ठिकाणी 29 तारखेला पाटीदार नेता हार्दिक पटेल याची सभा झाली होती. त्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ टीव्ही चॅनल्स, पेपर आणि सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
त्याच ठिकाणी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची 27 तारखेला सभा झाली होती. त्या सभेला हार्दिकच्या सभेच्या तुलनेत खूपच कमी गर्दी होती. त्यामुळेच आता पंतप्रधानांच्या सभेला हार्दीच्या सभेपेक्षा कमी गर्दी झाली तर चुकीचा संदेश जाईल आणि त्याचा नकारात्मक परिणाम भाजपवर होईल अशी भीती राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना लागली आहे. त्यामुळे ते चिंतेत आहेत.
पंतप्रधानांच्या सभेला हार्दिकच्या सभेपेक्षा जास्त गर्दी जमवण्यासाठी भाजपने खास प्लॅन तयार केला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डा स्तरावर बैठकांचं सत्र सुरू केलं आहे. प्रत्येक वॉर्डातून किती लोक आणयचे याचं टार्गेटही त्यांना दिलं जातंय. ग्रामिण भागातूनही मोठ्या प्रमामात गर्दी जमावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आत बघूया हार्दीक पटेलच्या सभेपेक्षा पंतप्रधानांच्या सभेला गर्दी जास्त होते की नाही.
COMMENTS