उत्तर प्रदेश – राज्यातील बरेलीमध्ये एका महिला भाजप नेत्या आणि पोलीस हवालदार यांच्यातील हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्योती मीश्रा असं या भाजपच्या नेत्याचं नाव असून त्यांनी व्हीपीन नावाच्या पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावली आहे. त्यानंतर त्याचप्रकारे प्रत्युत्तर देत या पोलीस हवालदारानंही त्यांच्या कानशिलात लगावली आहे. ट्राफीकच्या कारणावरून दोघांमध्या वाद झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. एएनआयच्या हाती हा व्हीडिओ लागला आहे. या दोघांविरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
https://twitter.com/ANINewsUP/status/964038639683502080
COMMENTS