जालन्यातील शिबिरात काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्ते वेगळ्या पोषाखात !

जालन्यातील शिबिरात काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्ते वेगळ्या पोषाखात !

जालना – काँग्रेस व्हिजन 2019 च्या शिबिराचं आयोजन आज जालन्यात करण्यात आलं आहे. या शिबिरात काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्ते वेगळ्या पोषाखात पहावयास मिळत आहेत. शिबिरातील सर्वच नेते आणि कार्यकर्त्यांनी गांधी टोपी परिधान केली आहे. त्यामुळं 2019 साठी काँग्रेस गांधी टोपी हायलाईट करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान काँग्रेसच्या शिबिरात समाजसेवक आण्णा हजारे यांच्यासह रामदेवबाबा यांच्यावर टीका करण्यात आली आहे. काँग्रेसची केंद्रात सत्ता होती, तेव्हा समाजसेवक आण्णा हजारे यांनी दिल्लीत मोठं आंदोलन केलं होतं. आण्णा हजारे यांच्या त्या आंदोलनास पडद्या अडून संघाचा पाठिंबा होता. आता आण्णा हजारे कुठे आहेत, जेव्हा काँग्रेसची सत्ता येईल तेव्हाच आण्णा हजारे पुन्हा येतील, अशी टीकाही काँग्रेस सोशल मिडियाचे मार्गदर्शक अभिजित सपकाळ यांनी केली आहे.

 

COMMENTS