नेमकं त्याच कालावधीत बाबांवर गोळीबार झाला – पुनम महाजन

नेमकं त्याच कालावधीत बाबांवर गोळीबार झाला – पुनम महाजन

मुंबई – भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याविषयीच्या आठवणींना त्यांची मुलगी म्हणजेच खासदार पुनम महाजन यांनी उजाळा दिला आहे. ‘माझे बाबा हे त्या दिवशी माझ्या घरी येणार होते. पण मीच त्यांना १५ मिनिटांनी यायला सांगितले आणि दुर्दैवाने नेमकं त्याच कालावधीत त्यांच्यावर गोळीबार झाला होता. मी बाबांना थांबायला सांगितलं नसते तर ते माझ्या घरी आले असते आणि पुढे ती घटनाच घडली नसती. त्यामुळे मी त्या १५ मिनिटांसाठी आजही स्वत:ला दोषी मानत असल्याचं पुनम महाजन यांनी म्हटलं आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

दरम्यन २००६  रोजी प्रमोद महाजन यांच्यावर वरळीतील ‘पूर्णा’ इमारतीतील घरात त्यांचा भाऊ प्रवीणने तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळच्या आठवणींना महाजन यांनी उजाळा दिला आहे. यावेळी पुनम महाजन भावूक झाल्या होत्या. या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी देखील प्रमोद महाजन यांची एक आठवण सांगितली. पंकजा मुंडे यांच्या लग्नात प्रमोद महाजन यांनीच पंकजा यांना उखाणा सांगितला होता. माझ्या लग्नात मंचावर असताना प्रमोदमामानेच मला उखाणा सांगितला होता असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS