विनायक मेटेंनी गुपचूप अंधारातच केलं शिवस्मारकाचं भूमिपूजन, असं अंधारात भूमिपूजन करणे योग्य नाही – भाजप

विनायक मेटेंनी गुपचूप अंधारातच केलं शिवस्मारकाचं भूमिपूजन, असं अंधारात भूमिपूजन करणे योग्य नाही – भाजप

मुंबई शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं गुपचूप अंधारात भूमिपूजन केलं असल्याची माहिती आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी शिवस्मारकाचं अरबी समुद्रात जलपूजन केलं होतं. त्यानंतर मेटे यांनी असं गुपचूप भूमिपूजन केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मेटे यांनी पुजाऱ्याला घेऊन शिवस्मारकाच्या खडकावर पुन्हा भूमिपूजन केलं आहे. मेटे यांनी काही अधिकारी आणि पुजाऱ्याला सोबत घेऊन भूमिपूजन केलं आहे.

दरम्यान विनायक मेटे यांनी केलेल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. असं अंधारात भूमिपूजन करणे योग्य नसल्याचं भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी म्हटलं आहे.

तर विनायक मेटे यांच्या या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही टीका केली आहे. स्मारकाचं किती वेळा भूमिपूजन करणार हा मोठा प्रश्न आहे. याआधीही त्यांनी प्रयत्न केला होता. त्यावेळी बोट बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. पण तरीही या सरकारवर कोणता तरी दबाव आहे त्यामुळे असं कृत्य घडत असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

COMMENTS