नागपूर – काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष प्रभावती ओझा यांचं गुरुवारी रात्री निधन झालं आहे. त्या ७२ वर्षांच्या होत्या. प्रभावती ओझा या गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान प्रभावती ओझा यांनी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य, हिमाचल प्रदेशसह विविध राज्यात पक्षाच्या निरीक्षक म्हणून काम केलं होते. याशिवाय विविध संस्थांच्या संचालकपदीही त्यांनी कामगिरी बजावली होती. त्यांच्या पश्चात मुलगा रामकिशन ओझा, मुलगी लता शर्मा व नातवंडे असा परिवार असून रामकिशन ओझा हे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
COMMENTS