मुंबई – भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या दगडफेकीचे पडसाद राज्यभरात चांगलेच उमटले असल्याचं पहावयास मिळालं आहे. भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानंतर बुधवारी राज्यभरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. भारिपने पुकारलेला हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. या बंदला समविचारी आणि डाव्या संघटनांचा पाठिंबा मिळाला असल्याचं ते म्हणालेत. तसेच दोन ते तीन घटनांचा अपवाद वगळता हा बंद शांततेत पार पडला असून हा बंद शंभ्भर ट्केक यशस्वी झाला असल्याचं ते म्हणाले आहेत.
तसेच भीमा कोरेगावमधील हिंसेला जबाबदार असलेले शिवराज प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी त्यांनी कालच केली होती. परंतु त्यांना अजूनही अटक झाली नसून या बंद नंतर तरी लवकरच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना अटक केली जाईल अशी आशा बाळगून आम्ही हा बंद मागे घेत आहोत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
COMMENTS