म्हणून अशोक चव्हाण, अजित पवार, तटकरे यांना अटक नाही – प्रकाश आंबेडकर

म्हणून अशोक चव्हाण, अजित पवार, तटकरे यांना अटक नाही – प्रकाश आंबेडकर

मुंबई – वंचित बहुजन आघाडीची पुढील आठवड्यात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीनंतर पुढील रणनीती ठरवणार असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आम्ही सध्या ड्रायव्हर सीटवर आहोत 14% मतदान मिळाले आहे तेवढंच मुसलमानांचे मत मिळाले असते तर आम्ही 30% पर्यंत पोहचलो असतो असंही यावेळी आंबेडकर म्हणाले आहेत.

दरम्यान मौलवींनी काँग्रेसच्या बाजूने मतदान करा असा फतवा काढला म्हणून काँग्रेसच्या बाजूने मतदान गेले असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच अशोक चव्हाण, सुनील तटकरे, अजित पवार चौकशी खाली आहेत. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीला वंचित बरोबर युती करणार नाही असा शब्द त्यांनी भाजपला दिल्यामुळे त्यांना अटक झाली नाही असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. तसेच वंचितकडून विधानसभा लढवण्यास अनेक जण इच्छुक आहेत या बद्दलचे निर्णय बैठकीत घेणार आहोत अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

COMMENTS