पंतप्रधानपदासाठी शरद पवार योग्य आहेत का ?, प्रकाश आंबेडकर यांचं मत !

पंतप्रधानपदासाठी शरद पवार योग्य आहेत का ?, प्रकाश आंबेडकर यांचं मत !

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे
पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत का? याबाबत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधानपदासाठी शरद पवार योग्य आहेत असं अजिबात वाटत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू हेदेखील पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकणार नाहीत असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजपाला अंदाजे १५० ते २०० जागा मिळतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शरद पवार, मायावती किंवा ममता बॅनर्जी या तिघांपैकी कोणीतरी एक पंतप्रधानपदासाठी योग्य ठरतील अशी चर्चा विरोधी पक्षांमध्ये सुरू होती. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारच काय राहुल गांधीही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत असं म्हटलं आहे.

COMMENTS