धनेश्वरी उदयोग समूहाचे डॉ. प्रतापसिंह पाटील अखेर  भाजपात !

धनेश्वरी उदयोग समूहाचे डॉ. प्रतापसिंह पाटील अखेर भाजपात !

उस्मानाबाद – डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी रविवारी लातूर येथे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक,लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर,ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे,प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर व अभिमन्यु पवार यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी उस्मानाबाद भाजपा लोकसभा संयोजक नितीन काळे, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचीही उपस्थिती होती.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी गेल्या चार वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यासह बार्शी तालुक्यातील अनेक कार्यक्रमात आपली उपस्थिती लावून लोकसभा निवडणूकीत उतरण्याचे संकेत दिले होते. मात्र चार वर्ष त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश न करता डॉ.प्रतापसिंह पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून आपले सामाजिक कार्य सुरु ठेवले होते. ते कोणत्या पक्षात जाणार याची उत्कंठा सर्वांना लागून राहिली होती. त्यांनी वाशी तालूक्यात घेतलेला महिला मेळावा ही प्रचंड यशस्वी ठरला होता. डॉ.प्रतापसिंह पाटील हे खासदार व्हावेत यासाठी उस्मानाबाद ते तुळजापूर अशी पायी दिंडीलाही जवळपास २००० युवक उपस्थित होते. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाला गर्दी होण्याचे कारण म्हणजे त्यांनी गेल्या चारवर्षात अनेक नविन सामान्य चेहरे सोबत घेऊन लहानातल्या लहान कार्यक्रमाला उपस्थित राहत होते. तसेच सामान्य कार्यकर्ते यांच्याशी थेट संपर्क ही करत आहेत. त्यामुळे ते कोणत्या राजकिय पक्षात प्रवेश करणार याविषयी संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात उत्सुकता होती.

डॉ.प्रतापसिंह पाटील यांची प्रतिक्रिया

मी अनेक दिवसापासून भाजपाच्या संपर्कात होतो.मात्र माझ्या काही अडचणीमुळे प्रवेश करु शकलो नव्हतो.मात्र मी मनाने गेल्या दोन वर्षापासून भाजपाजवळच होतो.मी लोकसभेला इच्छुक आहे मात्र पक्ष जी जबाबदारी माझ्यावर टाकेल ती जबाबदारी मी सर्वोतोपरी पार पाडेन.तसेच भाजपात अनेक नगरसेवक, जि.प.सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच,उपसरपंच व इतर पदाधिकारी येण्यास इच्छुक आहेत त्यांचा प्रवेश लवकरच टप्याटप्याने घेण्यात येईल.

COMMENTS