केंद्र सरकारच्या ‘पोक्सो’ अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी !

केंद्र सरकारच्या ‘पोक्सो’ अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजुरी !

नवी दिल्ली  – केंद्र सरकारच्या पोक्सो अध्यादेशाला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या केंद्र सरकारनं अध्यादेश काढला होता. तसेच यासंदर्भात केंद्र सरकारनं पोक्सो कायद्यात सुधारणा करून वटहुकूम काढला होता. त्यानंतर आज राष्ट्रपतींनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. कठुआ, सुरत आणि इंदूर या ठिकाणी लहान मुलींवर बलात्कार करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत केंद्र सरकारविरोधात आंदोलनंही करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारनं तात्काळ बैठक घेत काल अध्यादेश काढला होता.

दरम्यान या अध्यादेशाला मंजुरी दिल्यामुळे १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. १६ वर्षांपेक्षा मुलीवर बलात्कार केल्यास कमीत कमी १० वर्ष ते २० वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून दोषीला जन्मठेपेची शिक्षा देण्याचीही तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.

 

COMMENTS