सोशल मीडियाचा वापर आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. कुणी व्यवसायासाठी, कुणी राजकारणासाठी तर कुणी मित्रांच्यासोबत कनेक्ट ठेवण्यासाठी सोशल मीडियाची वापर करतात. अनेक राजकारणी तर आता आपल्या मतदारांशी संवाध साधण्यासाठी ट्विटरचा वापर करतात. तसंच त्यांची अधिकृत भूमिकाही ट्विटरवरुन मांडताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, शशी थरुर यांच्यासारखे नेत्यांना ट्विटरवर मोठा फॅन फॉलोअर आहे.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचंही राष्ट्रपती भवनाचं अधिकृत ट्विटर अकाऊंट आहे. राष्ट्रपतींना तब्बल 40 लाख 7 हजार लोक फॉलो करतात. मात्र राष्ट्रपती केवळ एका व्यक्तीला फॉलो करतात. तो व्यक्ती कोण असेल याची उत्सुकता तुम्हाला लागली असेलच. ते केवळ माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फॉलो करतात. ते एकाच व्यक्तीला फॉलो का करतात ? किंवा तसे काही संकेत आहेत का ? याविषयी माहिती नाही.
COMMENTS