पंतप्रधानांच्या घरी पाळणा हलला !

पंतप्रधानांच्या घरी पाळणा हलला !

नवी दिल्ली  सर्वात तरुण असलेल्या पंतप्रधानांच्या घरी आज पाळणा हलला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात सध्या नवीन पाहूणीचं जोरदार स्वागत आणि कौतुक केलं जात आहे. तसेच ही नवीन पाहूणी घरात आल्यामुळे आनंदीमय वातावरण असल्याचं पहावयास मिळत आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा अड्रेन यांनी आज गोंडस मुलीला जन्म दिला आहे. याबाबतची माहिती अड्रेन यांनी इंस्टाग्रामवर दिली असून त्यांनी  बाळ आणि जॅकिंडा हे दोघेही सुदृढ असल्याचं सांगितलं आहे. 37 वर्षीय अड्रेन या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण आणि पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.

दरम्यान जॅकिंडा यांनी त्यांचे पती आणि नवजात बालिकेसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत हे दोघंही आनंदी दिसत असूनआम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास सुदृढ मुलगी जन्माला आली. तिचे वजन 3.31 किलो आहे. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. तसेच येथील ऑकलँड सिटी रुग्णालयाच्या पथकाचेही आभार मानतो”. असं ट्वीट जॅकिंडा यांच्या पतीनं केलं आहे.

 

COMMENTS