माजी मुख्यमंत्री मधू कोडांना तीन वर्षांचा तुरुंगवास, कोळसा घोटाळा भोवला!

माजी मुख्यमंत्री मधू कोडांना तीन वर्षांचा तुरुंगवास, कोळसा घोटाळा भोवला!

दिल्ली – झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना कोळसा घोटाळा भोवला आहे. मधू कोडा यांना कोळसा घोटाळ्यात दोषी ठरवत सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी त्यांना शिक्षा ठोठावली आहे. कोडा यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ लाख रुपये दंड सुनावला आहे. तसेच माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोक कुमार बसू आणि अन्य एकाला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी कलम १२० बी अंतर्गत दोषी ठरवत कारावासाची शिक्ष सुनावण्यात आली आहे.

झारखंडमधील कोळसा खाण वाटपात कोलकाता येथील ‘विनी आयर्न आणि स्टील कंपनी’ला नियमबाह्य पद्धतीने खाण वाटप केल्याचे कोडा आणि इतर सनदी अधिकाऱ्यांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. या कंपनीला झारखंडमधील राजहरा इथल्या कोळसा खाणी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, आपली शिक्षा कमी करण्याची विनंती कोडा यांनी न्यायालयाकडे केली होती. आपली प्रकृती ठिक नसून दोन लहान मुली आहेत त्यामुळे माझ्या विनंतीचा गांभीर्यानं विचार करावा अशी विनंती कोडा यांनी न्यायालयाकडे केली होती.

 

 

COMMENTS