…त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे मिनिट्स रिझर्व्ह बँकेकडुन लिक झाले – पृथ्वीराज चव्हाण

…त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे मिनिट्स रिझर्व्ह बँकेकडुन लिक झाले – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारबाबत मोठा खुलासा केला आहे. मोदी सरकारमधील दोन नव्या गोस्टी समोर आल्या असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

नोटा बंदीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती.  या बैठकीला येताना सर्व मंत्र्यांना आपले फोन बंद ठेवायला लावले होते अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. तसेच कोणतीही चर्चा न करता पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करणार असल्याचं  सांगुन निघून गेले असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षापासुन रिझर्व बंकेचे मिनिट द्या अशी मागणी केली जात होती. परंतु ही माहिती देण्यात आली नाही. परंतु रिझर्व्ह बँकेचे मिनिट्स रिझर्व्ह बँकेकडुन लिक झाले असून सरकार आणि रिझर्व्ह बँकेमधील टकरावामुळेच ही माहिती लिक झाली असल्याचा खुलासाही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

COMMENTS