पुणे – संसदेचं अधिवेशन वाया गेल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान मोदींसह देशभरातील भाजप नेत्यांनी आज एकदिवसीय उपोषण केलं. परंतु भाजपच्या दोन आमदारांनी पुण्यात अवघ्या अडीच तासात आपला ‘उपवास’ सोडला असल्याचं पहावयास मिळालं आहे. सँडविच आणि वेफर्स खाऊन आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी आपल्याच पक्षाच्या उपोषणाला हरताळ फासला आहे.
दरम्यान भेगडे आणि तापकीर यांनी सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमंदिरासमोर सुरू असलेल्या एकदिवसीय उपोषणात सहभाग घेतला. मात्र काही वेळातच ते काऊन्सिल हॉलला गेले. तिथे पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम आणि जलयुक्त शिवार योजनेसंबंधी बैठक होती. बैठक सुरु होताच नेहमीप्रमाणे नाश्त्याच्या प्लेट्स समोर आल्या. यावेळी या दोघांनीही सँडविच, वेफर्स आणि बर्फीवर ताव मारला असल्याचं पहावयास मिळालं आहे.
COMMENTS