पुण्यात बापट विरुद्ध काकडे !

पुण्यात बापट विरुद्ध काकडे !

पुणे –  गेली काही दिवसांपासून पुण्यात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे विरुद्ध गिरीष बापट असा सामना पहायला मिळत आहे. काकडे आणि बापट यांच्या दोन्ही गटांकडून संधी मिळताच एकमेकांवर टिकेचा वर्षाव केला जात आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी गिरीष बापट यांनी वर्षभरानंतर हे सरकार पडणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. परंतु बापट यांचे वक्तव्य चुकीचे असून पुन्हा भाजपच सत्तेवर येईल असा विश्वास संजय काकडे यांनी केला आहे. तसेच त्यांनी बापट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये भाजप सरकार पडणार असल्याचं भाकीत संजय काकडे यांनी केलं होतं. त्यावेळी बापट यांच्या समर्थकांनी संजय काकडे यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे संधी मिळताच संजय काकडेंनीही बापट यांच्यावर टीका करत पक्षाध्यक्षांकडे कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे पुण्यात आता बापट विरुद्ध संजय काकडे असा सामना पहावयास मिळत आहे.

COMMENTS