मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. येत्या 13 तारखेला ते रत्नागिरीतील नाणार या गावाला भेट देणार आहेत. यादरम्यान ते रिफायनरी संदर्भात स्थनिक ग्रामस्थाशी चर्चा करणार आहेत. कारण या गावातील नागरिकांनी रिफायनरी प्रकल्पाला आहे विरोध दर्शवला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची भेट घेऊन रिफायनरी बाबत चर्चा करणार आहेत व त्यानंतर ते रिफायनरीबाबत आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं बोललं जात आहे.

 

दरम्यान नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला ग्राम्थांनी जोरदार विरोध केला आहे. नाणार प्रकल्प होऊ न देण्याची भूमिका त्यांनी घेतली असून काही दिवसांपूर्वी याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील नाणार ग्रामस्थांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील या प्रकल्पाबाबत गावक-यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या चर्चेनंतर राज ठाकरे यांची काय भूमिका असणार आहे. याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS