…तर आत्तापर्यंत मुंबई आणि पुण्यात मेट्रो सुरू झाली असती – पंतप्रधान मोदी

…तर आत्तापर्यंत मुंबई आणि पुण्यात मेट्रो सुरू झाली असती – पंतप्रधान मोदी

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोच्या तीसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. तसेच शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे यांचं स्मरण करत पुणे ही बाळासाहेब ठाकरे यांची जन्मभूमी आहे अशी आठवणही करुन दिली. तसेच अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असते तर आत्तापर्यंत मुंबई आणि पुण्यात मेट्रो सुरू झाली असती असंही यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो.केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीनं पायाभूत सुविधा विकसित करत आहे. पुण्यात लोकांना वाहतूक कोंडीचा दररोज सामना करावा लागतोय. त्यांचा खूप वेळ वाया जातो. या प्रकल्पामुळे लोकांना वाहतूकीचा त्रास होणार नसल्याचंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या 70 वर्षात पुण्याला मिळला नाही एवढा निधी भाजप सरकारने दिला असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या आयटी उद्योगातील आयटीयनसच्या सोयीसाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. या सेवेमुळे हा उद्योग विस्तारेल असंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS