पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीचा बोगसपणा उघड, उदघाटना दिवशीच गळू लागली इमारत

पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीचा बोगसपणा उघड, उदघाटना दिवशीच गळू लागली इमारत

पुणे – महापालिकेच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन आज उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते मोठ्या गाजावाजात झाला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या नविन इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.महापालिकेनं तब्बल ४९ कोटी रुपये खर्चून ही नविन इमारत उभारली आहे परंतु ही इमारत उद्घाटनाच्या दिवशीच गळू लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यात आज मुसळधार पाऊस सुरू आहे. आणि याच पावसाने पुणे महानगरपालिका इमारत बांधण्यात आलेला बोगसपणा समोर आला आहे. एकीकडे मान्यवरांचे भाषण सुरू होते आणि दुसरीकडे नवीन इमारत गळत होती.

इमारतीचे बांधकाम अपूर्ण असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी सत्ताधार्यांनी उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्याचप्रमाणे निमंत्रण पत्रिका आणि जाहिरातीतील फोटोंवरूनही आरोप प्रत्यारोप सुरु होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. आणि त्यातच पावसाने पुणे महापालिकेच्या इमारतीचा उद्घाटनादिवशीच सत्य समोर आणलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून इमारतीच्या बांधकाम दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे

COMMENTS