लोकसभा निवडणुक अगदी 6 महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे सर्वच पक्ष जोरदारपणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदवाराबाबतही चाचपणी केली जात आहे. पुणे लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत आघाडीला जोरदार फटका बसला. ऐकेकाळी शहरात दबदबा असलेली काँग्रेस अस्तित्वासाठी झटत असल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचीही मागील तीन निवडणुकीत वाताहात झालेली आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसनं आता आघाडी करुन निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र लोकसभेसठी पुण्यात दोन्ही पक्षांकडे जिंकून येईल असा चेहरा नाही. त्यामुळेच राजकारणाबाहेरचा चेहरा आघाडीकडून दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांचं नाव आघाडीकडून लोकसभेसाठी घेतलं जात आहे. बिल्डर असूनही सतिश मगर यांची इमेज चांगली आहे. मगरपट्टा सीटी आणि नांदेड सीटी सतिश मगर यांनी विकसीत केलेले प्रकल्प आहेत. त्याची पुण्यात आणि देशभर चांगली चर्चा आहे. ज्या शेतक-यांच्या जमीनी या प्रकल्पामध्ये गेल्या आहेत त्यांना या प्रकल्पांमध्ये भागीदार करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे जमीनीच्या मोबदल्याचा वाद निर्माण झाला नाही. तसंच एकाद पैसे देऊन शेतक-यांना वा-यावर सोडलेलं नाही. देशात अशा प्रकराचा बहुद पहिलाच प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये सतिश मगर यांच्याविषयी चांगली इमेज आहेत. त्याचसोबत या दोन्ही प्रकल्पांमध्ये केलेल्या विविध सोईसुविधांमुळे बाहेरुन आलेल्या आणि उच्चशिक्षीत नागरिकांमध्येही मगर यांच्याबद्दल चांगली प्रतिमा आहे. त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ते काँग्रसचे उमेदवार होऊ शकतात. जागांची अदलाबदली झाली आणि जागा राष्ट्रवादीकडे गेली तरी ते राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतात. दोन्ही काँगेसच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शध्यक्ष शरद पवार यांच्याशाही मगर यांच्या अत्यंत चांगले संबंध आहेत. त्याचाही फायदा आघाडीला होऊ शकतो. मगर यांना तिकीट दिल्यास ते भाजपच्या उमेदवारासमोर तगडं आव्हान निर्माण करु शकतात.
COMMENTS