शरद पवार यांच्या जीवाला धोका,  पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल !

शरद पवार यांच्या जीवाला धोका, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल !

पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली आहे. काही वेबपोर्टलवरुन शरद पवार यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषणांचे व्हिडीओ टाकले जात आहेत. त्याखाली शरद पवार यांच्याविरोधात टोकाच्या कमेंट केल्या जात असून या कमेंटवरुन शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप लक्ष्मीकांत खांबिया यांनी केला आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान सोशल मीडियात सातत्यानेच शरद पवार यांच्यावर जोरदार टीका होत असते. यात चिथावणीखोर भाषाही वापरली जाते. याची दखल घेऊन तातडीने अशा कमेंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लक्ष्मीकांत खांबिया यांनी केली आहे.

पत्रकार भाऊ तोरसेकर आणि पोस्टमन या युट्युब चॅनेलवर कमेंट करणाऱ्यांविरोधात लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तसेच, कोरेगाव भिमा दंगलीचे खरे सुत्रधार कोण? असा प्रश्न उपस्थित करत, हे प्रकरण गंभीर असल्याचंही राष्ट्रवादीच्या खाबिया यांनी तक्रारीत म्हटले आहे.

COMMENTS