ब्रेकिंग न्यूज – निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा मोठा निर्णय !

ब्रेकिंग न्यूज – निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांचा मोठा निर्णय !

पुणे – यापुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही अंस ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पपवार यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात आज आठवणीतले पुणे या विषयावर शरद पवार आणि श्रीनिवास।पाटील यांची मुलाखत प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतली. त्यावेळी पुण्यातील कॉलेज निवडणुकीतील किस्से पवारांनी सांगितले. पवार जे उमेदवार पुण्यात कॉलेजमध्ये उभे करत असत ते निवडूण येत असतं असं पवारांनी सांगितलं. त्यावर आता पुण्याचं नेतृत्व करणार का असा प्रश्न सुधीर गाडगीळ यांनी केला. त्यावर आता आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

2014 पासून शरद पवारांनी लोकातून कोणतीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र 2019 मधील संभाव्य राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्याला शरद पवार यांच्या आजच्या विधानामुळे पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार कोणताही मोठा निर्णय पु्ण्यातून जाहीर करतात. याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

COMMENTS