नवी दिल्ली – भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर प्रतिहल्ला केला आहे. सोहराबुद्दीन शेख कथित एन्काऊंटरप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर स्मृती इराणी यांनी आज ट्वीट केलं असून यामध्ये अमित शाह यांना 2014 मध्ये क्लिनचीट मिळाली आहे, हे असत्याची मशिन राहुल गांधी यांना माहित नाही का? राजकीय हेतूने अमित शाह यांना फसवण्यात आले, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते असंही स्मृती इराणी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
#JhoothKiMachine Rahul Gandhi is back in action. He knows that after following due process, Court discharged Mr Shah in 2014. Court had also held that Amit bhai was implicated by CBI for political reasons. Will Rahul answer who in the UPA ordered this political witch hunt? https://t.co/3vmJ0Pkc8E
— Smriti Z Irani (@smritiirani) November 22, 2018
तसेच राहुल गांधी सांगतील का, की त्यांच्या शासनात हे कोणाच्या आदेशावरुन करण्यात आले होते? मी निश्चितपणे सांगू शकते, राहुल गांधी यांनी कधी गीता वाचली नसणार. कारण ते एवढे खोटं बोलले नसते असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी सीबीआयचे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगाडगे यांचा नुकताच जबाब नोंदवण्यात आला. भाजप अध्यक्ष अमित शाह हे कथित एन्काऊंटरचे सूत्रधार आहेत, असे संदीप तामगाडगे यांनी सांगितले होते. यावर अमित शाह सत्यापासून लांब पळू शकत नाहीत, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं होतं.
The Gita says you can never escape the truth and so it has always been.
Sandeep Tamgadge has called Amit Shah a “key conspirator” in his testimony.
It's completely appropriate for the BJP to have such a man as its President. https://t.co/yDDvf27zce
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 22, 2018
COMMENTS