काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींची नियुक्ती

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधींची नियुक्ती

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काँग्रेसला १९ वर्षानंतर राहुल गांधींच्या रुपात नवे अध्यक्ष मिळाले आहेत. येत्या 16 तारखेला राहुल गांधी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. राहुल गांधी यांच्या निवडीनंतर मुंबई, दिल्लीसह देशभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

गांधी घराण्यातील सहावे अध्यक्ष
राहुल गांधी हे काँग्रेसचे 18 वे अध्यक्ष झाले आहेत. तर गांधी घराण्यातील अध्यक्षपद भूषविणारे ते सहावे व्यक्ती आहेत. यापूर्वी नेहरु-गांधी कुटुंबातून सर्वात अगोदर मोतीलाल नेहरु 1919 साली पक्षाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर मोतीलाल नेहरु यांचे चिरंजीव आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी अध्यक्षपद सांभाळलं त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सोनिया गांधी या सलग 19 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, आता ही जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवली आहे.

आतापर्यंतचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी

1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 195

4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते 2017

18) राहुल गांधी

 

 

COMMENTS