काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं एकदिवसीय उपोषण !

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं एकदिवसीय उपोषण !

नवी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज एकदिवसीय उपोषणाला केलं आहे. राजघाटवर दलितांच्या समर्थनार्थ त्यांनी उपोषण केलं आहे. परंतु उपोषणाला राहुल गांधी दोन तास उशिराने आले असल्याचं पहावयास मिळालं आहे. 2 एप्रिलला दलितांनी पुकारलेला भारत बंद आणि त्यांच्यावरील कथित अत्याचाराविरोधात राहुल गांधींनी उपोषण केलं आहे. तसेच त्यांच्यासोबत देशभरातल्या काँग्रेसच्या जिल्हा आणि शहर मुख्यालयातील कार्यकर्त्यांनी उपोषण केलं आहे.

दरम्यान कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा आरोप करुन त्याची थेट अटक होणार नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत दिला होता. या निर्णयाविरोधात दलितांनी भारत बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण लागलं होतं. यामध्ये देशभरात दहा जणांचा मृत्यू झाला होता. अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा गैरवापर वाढू नये, त्यातून चुकीच्या लोकांना शिक्षा होऊ नये, यासाठी अशा पद्धतीची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. परंतु याला विरोध करत कोर्टानं आपला निर्णय मागे घ्यावा. कोर्टाच्या या निर्णयामुळे दलितांवर अन्याय झाला असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS