झारखंडमधील जाहीर सभेदरम्यान राहुल गांधींनी केलं लोकनृत्य ! VIDEO

झारखंडमधील जाहीर सभेदरम्यान राहुल गांधींनी केलं लोकनृत्य ! VIDEO

रांची – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज झारखंडचा दौरा केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी रांची येथील मोहराबादी मैदानावर जाहीर सभा घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी तेथील स्थानिक नागरिकांसोबत लोकनृत्य केलं. राहुल गांधी यांनी केलेलं हे नृत्य आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं होतं.

दरम्यान आज पार पडलेल्या सभेत काँग्रेसनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. या सभेला राज्यातील लाखो नेते आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. राज्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी करुन भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली आहे.

COMMENTS