मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल महाराष्ट्र प्रचार सभा घेतल्या. राहुल गांधी यांच्या या सभेकडे काँग्रेसच्याच काही नेत्यांनी पाठ फिरवली असल्याचं दिसून आलं आहे. लातूर जिल्ह्यातील औसामध्ये राहुल गांधी यांची पहिली सभा पार पडली. त्यानंतर त्यांनी मुंबईत दोन सभा घेतल्या. मात्र या दोन्ही सभांना मुंबई काँग्रेसचे दोन नेते गैरहजर होते. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा आणि दुसरे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी राहुल गांधीच्या सभेला दांडी मारली. त्यामुळे या नेत्यांची नाराजी दिसून आली
आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हे नेते नाराज असल्यामुळे पक्षाला मुंबईत धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय निरुपम यांनी काही दिवसांपूर्वी आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु मिलिंद देवरा यांनीही पक्षापासून अंतर ठेवले असल्याचं दिसत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसलेल्या काँग्रेसला आता विधानसभा निवडणुकीत अंतर्गत नाराजीची फटका बसत असल्याचं दिसत आहे.
COMMENTS