राहुल गांधीं प्रतिमा बदलण्यात यशस्वी होत आहेत, “ही” आहेत 5 कारणे !

राहुल गांधीं प्रतिमा बदलण्यात यशस्वी होत आहेत, “ही” आहेत 5 कारणे !

राहुल गांधी त्यांची प्रतिमा बदलण्यात यशस्वी होत आहेत. पप्पू म्हणून हेटाळणी होत असलेल्या राहुल गांधीची आता सत्ताधारी दखल नव्हे चांगलीच धास्ती घेत आहेत.  त्याच्यामागे विविध कारणे आहेत. आम्ही काही कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला ही 5 कारणे दिसून आली.

अभिनेत्री आणि माजी खासदार राम्याच्या नेतृत्वाखालील सोशल मीडिया टीम –

2014 च्या निवडणुकीत भाजपनं सोशल मीडियाचा जोरदार वापर केला होता. काँग्रेसला नामोहरम करण्यात आणि भाजप आणि मोदींची प्रतिमा उंचावण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा होता. निवडणुकींतरही भाजपनं सातत्यानं सोशल मीडियाचा वापर सुरू ठेवला आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवत राहुल गांधी यांनी सोशल मीडियाची तगडी टीम तयार केली आहे. कर्नाटकातील अभिनेत्री आणि माजी खासदार दिव्या स्पंदना यांच्या नेतृत्वाखालील सोशल मीडियाची टीम अत्यंत कल्पकपणे राहुल गांधींना प्रमोट करत आहे. त्याचा फायदाही राहुल गांधी आणि काँग्रेसला होताना दिसत आहे.

मोदींवर थेट हल्लाबोल

राहुल गांधी पूर्वी आक्रमकपणे मोदींवर हल्लाबोल करत नसत. मात्र या गुजरात निवडणुकीत त्यामध्ये बदल झाला आहे. सोशल मीडियातील विकास वेडा झाला या थीमवर पक्षाने प्रचार केला. तो अनेक दिवस ट्रेंड करत होता. त्याचबरोबर जीएसटी, नोटाबंदी आणि बेरोजगारी या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी मोदींवर थेट हल्लाबोल केला. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

ट्विटरवरही राहुल गांधी मोठ्या प्रमाणात अक्टिव

राहुल गांधीं हल्ली सातत्याने ट्विट करत आहेत. त्यांच्या ट्विटची चर्चाही चांगली होत आहे. जीएसटीला त्यांनी गब्बर सिंग टॅक्स असं संबोधलं आणि त्याचं ट्विट केलं. तेही ट्रेंड झालं. त्यामुळेच राहुल गांधी यांचे ट्विटरवरील फॉलोअर वाढत आहेत.

 

अधिक आत्मविश्वापूर्ण भाषणे

वरील सर्व घटकांमुळे राहुल गांधींच्या भाषणात आत्मविश्वास दिसू लागला आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला धारदारपणा येत आहे. त्यामुळेच आता त्यांच्या सभेला गर्दी होऊ लागली आहे. आणि भाषणातील मुद्यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. त्याचाही फायदा राहुल आणि काँग्रेसला होऊ लागला आहे.

 

मोदींप्रमाणे राहुल यांच्याकडूनही सेल्फीचा कल्पक वापर

नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणे राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सेल्फीचाही वापर अत्यंत कल्पकतेने सुरू केला आहे. त्याचाही फायदा त्यांना होत आहे. अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी युवक आणि युवतींची गर्दी होत आहे. काही दिवसांपूर्वी एक तरुणी सेल्फी काढण्यासाठी राहुल यांच्या गाडीवर चढली. ती घटनाही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

COMMENTS