अमित शहांच्या मुलाने केलेल्या घोटाळ्याबाबत तुम्ही पंतप्रधानांना प्रश्न का विचारत नाही ? राहुल गांधींचा प्रसारमाध्यमांना सवाल ?

अमित शहांच्या मुलाने केलेल्या घोटाळ्याबाबत तुम्ही पंतप्रधानांना प्रश्न का विचारत नाही ? राहुल गांधींचा प्रसारमाध्यमांना सवाल ?

अहमदाबाद – नेहमी मीडियाच्या अवघड प्रश्नांना तोंड देणा-या राहुल गांधी यांनी काल मीडियाच्या प्रतिनिधींना प्रश्न केला. मला तुम्ही नेहमी प्रश्न विचारता, त्याची मी योग्य पद्धतीनं उत्तरे देतो. पण तुम्ही राफाल विमान खरेदीतील घोटाळ्यात हस्तक्षेप करणा-या अमित शहांच्या मुलाविषयी पंतप्रधानांना प्रश्न का विचारत नाही असा सवाल केला.

अमित शहा यांच्या मुलाने राफाल विमान खरेदी प्रकरणात हस्तक्षेप केला. एका व्यावसायिकाला फायदा मिळवणू देण्यासाठी ते विमान तिप्पट किंमत मोजून खरेदी केले. ही देशाची लूट असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या विषयावर तुम्ही मोदींना प्रश्न का विचारत नाही असा थेट सवाल राहुल गांधी यांनी मीडियातील प्रतिनिधींना केला. एरवी सर्व विषयावर भरभरुन बोलणारे पंतप्रधान याविषयी गप्प का आहेत असा सवालही राहुल गांधी यांनी केला.

COMMENTS