मुंबई – रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन प्रकाश मेहतांना अखेर काढण्यात आलं आहे. रायगडमध्ये पक्षाबद्दल भरीव कामगिरी न केल्यामुळे, तसेच स्थानिक कार्यकर्ते नाराज असल्यामुळे आणि गृहनिर्माण विभागाधील कामगिरीमुळे नाराज असलेल्या मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं समजत आहे. प्रकाश मेहतांच्या ठिकाणी आता राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान प्रकाश मेहतांबद्दल मुख्यमंत्र्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. तसेच रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर पक्षाबाबत त्यांची कोणतीही भरीव कामगिरी दिसून आली नाही. गृहनिर्माण विभागातील कामगिरीमुळे मुख्यमंत्री नाराज होते. या सर्व घनटनांनंतर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी त्यांना रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन काढलं असून राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे आता रायगडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे.
COMMENTS