राज ठाकरेंची फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन ठाण्यात जाहीर सभा

राज ठाकरेंची फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन ठाण्यात जाहीर सभा

ठाणे –  अनधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. 18 नोव्हेंबरला सायंकाळी ठाण्यात ही सभा होणार आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधी आंदोलनातील पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून सूडबुद्धीने कारवाई असा नेत्यांकडून आरोप होत आहे. कार्यकर्त्यांवर चॅपटर केसेस आणि 1 कोटींचा  जामीन मागण्यात येत आहे. कार्यकर्त्यांवर जिल्ह्यातून तडीपार कारवाई करण्याच्याही पोलिसांच्या हालचाली सुरू आहेत. पोलिसांची कारवाई अन्यायकारक असल्याचा पक्षाच्या नेत्यांचा दावा असून, आता राज ठाकरे काय भूमिका घेतील हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

COMMENTS