मुंबई – मराठी उद्योजकांना पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्र बिझिनेस क्लबच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. मुंबई महानगरपालिकेत कंत्राटदार राजस्थानमधील एका गावातील आहेत. महाराष्ट्र ही भूमी आपण समज़ून घेतली पाहिजे. बाहेरून लोक आले ते व्यवसाय करत बसले आपले लोक नोकरी करत बसले असल्याची खंत यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात सर्व सोयीसुविधा असल्याने बाहेरून लोक व्यवसायासाठी आले. बाहेरील लोकांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. महाराष्ट्रातील शहरांचे महत्त्व दुर्दैवाने मराठी लोकांना समजत नाही. त्यामुळे शहरांमध्ये मराठी लोकसंख्या कमी होत आहे आणि बाहेरील लोकांची संख्या वाढत असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. मराठी माणसाला व्यवसायात आक्रमक व्हावे लागेल. महाबळेश्वरमध्ये ६०ते ७० % लोक हे गुजराती जातात. आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या सतत मनात सर्व गोष्टी गुजरातमध्ये नेण्याचं असतं असंही राज यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच बुलेट ट्रेन गुजरातमध्येच का ? दुसरीकडे का नाही असा सवालही यावेळी राज यांनी केला आहे.
दरम्यान ठाणे जिल्ह्यात ७-८ महानगरपालिका आहेत. ठाण्यात लोकसंख्या वाढत आहे. ही शहरं जर मराठी माणसाच्या हातातून गेली तर तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्थळांवर स्वःताचा ठसा उमठवा. वेगवेगळ्या राज्याची भाषा वेगळी आहे , संस्कृती वेगळी आहे. भारतातील प्रत्येक राज्य हा एक देश आहे. महाराष्ट्रावरती मी एक डॉक्युमेन्ट्री बनवत आहे. मी राजकीय पक्ष काढला यामध्येही चढ उतार होतात. सर्वकाही कोकणात असताना तिकडे चायनिजची दुकाने आहेत, कोकणात काय असं कमी आहे की तिकडे चायनिज दुकाने लागतात. महाराष्ट्रातील ८ भारत रत्नांपैकी ७ भारतरत्न ही कोकणपट्ट्यातील आहेत आणि यापैकी चार भारतरत्न ही दापोलीतील आहेत असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS