अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा !

अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा !

मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट टाळली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु ठरलेल्या वेळेनुसार अमिता शाह हे मातोश्रीवर साडे सात वाजता दाखल झाले आहेत. अमित शाह यांचं ‘मातोश्री’वर आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे. त्यानंतर अमित शाह, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये प्राथमिक चर्चा, झाली असून  त्यानंतर उद्धव आणि शाह या दोघांचीच बंद दाराआड बैठक घेण्यात आली आहे.

दरम्यान भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी आजच्या दौ-यादरम्यान बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.  त्यानंतर त्यांनी ठरलेल्या वेळेनुसार उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा करण्यात आली आहे. याबाबत अजून माहिती मिळाली नसून शिवसेना-भाजपमध्ये युती होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS