सातारा- साता-यात आज मनसेचा पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला स्वतः राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे आज साता-यात पहिल्यांदाच लोकांशी संवाद साधणार आहेत. सभेअगोदर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी गुजरातचे पंतप्रधनांनी शेवटच बजेट आज सादर केलं असल्याचं राज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान माथी भडकवुन जातीपातीच राजकारण करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरु आहे. खोटं बोलण्यात भाजपा सरकार पटाइत असून नरेंद्र मोदी म्हणजे नमो रुग्ण असून केंद्र व राज्यात फसवणुक सुरु असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस दररोज आकडेमोड करत आहेत. त्यामुळे हे मुख्यमंत्री आहेत की रतन खत्रीचा मटका चालणारे एजंट अशी टीकाही राज यांनी केली आहे.
COMMENTS