प्लास्टिक उद्योजकांकडे निवडणुकीच्या फंडाची मागणी – राज ठाकरे

प्लास्टिक उद्योजकांकडे निवडणुकीच्या फंडाची मागणी – राज ठाकरे

मुंबई – राज्यातील प्लास्टिक बंदीवरुन राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्लास्टिक बंदी हा एक फार्स असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच प्लास्टिक उद्योजकांकडून निवडणुकीच्या फ़ंडाची मागणी केली गेली असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे ही बंदी काही काळापुरती असणार असल्याचं राज यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे या प्लास्टिक बंदीवर गेल्या 4 दिवसांमध्ये काहीही विधान नाही, त्यामुळे ही एका खात्याची बंदी आहे का असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान प्लास्टिकवर बंदी करताना काही पर्याय आणला आहे का ? असा प्रस्नही राज यांनी विचारला असून सरकारने पहिलं काम लोकांना उगाच दंड न लावण्याचं करावं. तसेच रामदास कदम यांनी नाशिक महापालिकेत कसं काम केलं ते जाऊन पाहावं. एखायाला आलेला झटका हे राज्य किंवा सरकारचं धोरण होऊ शकत नाही तसेच लोकांनी प्लास्टिक बंदीचा दंड भरू नये असं आवाहनही यावेळी राज ठाकरे यांनी केलं आहे.

COMMENTS