राजस्थान निवडणुकीबाबत सट्टेबाजाराचा “असा” आहे निवडणूक अंदाज !

राजस्थान निवडणुकीबाबत सट्टेबाजाराचा “असा” आहे निवडणूक अंदाज !

नवी दिल्ली – राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोणाची हार होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. सट्टाबाजारही याठिकाणी जोमात असल्याचं दिसत आहे. सट्टेबाजारात काँग्रेस भाजपला भारी पडत असल्याचं दिसत आहे. याठिकाणी काँग्रेसला जवळपास 128 जागा मिळतील असा अंदाज सट्टाबाजारात वर्तवला जात आहे. तर भाजपला 54 ते 56 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान एका सट्टेबाजाने सट्टेबाजारात कोणत्या पक्षावर किती लोकांनी सट्टा लावला आहे याबाबतची माहिती दिली आहे. यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसच्या बाजूनेच सट्टा लावला जात असल्याची माहिती त्याने दिली आहे. काँग्रेसला 128 पेक्षा जास्त जागा आणि भाजपला 54 ते 56 जागा मिळतील असा अंदाज  सट्टेबाजांनी दिला आहे.

तर दुस-या सट्टेबाजानेही काँग्रेसलाच कौल दिला आहे. जास्तीत जास्त काँग्रेस पक्षावर सट्टा लावला जात असून काँग्रेसला 132-134 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. तर भाजपला 52 ते 54 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या या निवडणुकीबाबत काँग्रेस-भाजपवर जोरदार सट्टा लावला जात असून उमेदवारांची घोषणा होण्यापूर्वी सट्टेबाजाराकडे सर्वांनी पाठ फिरवली होती. परंतु आता काँग्रेसवर जास्तीत जास्त सट्टा लावला जात असल्याचं त्याने सांगितलं आहे. सट्टेबाजाराच्या या अंदाजामुळे सध्या तरी काँग्रेसचे चांगले दिवस येणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS