एवढं करुनही आम्हाला मते का मिळत नाहीत ? –  राज ठाकरे

एवढं करुनही आम्हाला मते का मिळत नाहीत ? –  राज ठाकरे

ठाणे – महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या आणि भूमिपुत्रांच्या हिताची भूमिका नेहमीच मनसेकडून घेतली जाते, मग तो नोकरीचा प्रश्न किंवा मराठीच्या संवर्धनाचा प्रश्न असो.. सर्व बातमीत मराठी माणसाच्या हिताची भूमिका मनसे घेते, तरीही आम्हाला मते का पडत नाहीत असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पडलाय.

ठाण्याच्या सभेत काल त्यांनी गेल्या अनेक दिवासंपासून सुरू असलेल्या फेरीवाल्याच्या प्रश्नावर जोरदार बँटिंग केली. रेल्वेने मुंबईत दररोज 60 ते 70 लाख प्रवाशी प्रवास करतात त्यांच्या हिताची भूमिका मी किंवा मनसे घेते. तर विरोधी पक्ष एकवटून काही लाखात असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांची बाजू घेतात. आम्ही कायदा मोडत नाही, तर कायदा मोडला जातो आहे, तो मोडू नये, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होऊ नये म्हणून मनसे काम करते. खरतंर हे काम सरकारचे आहे. पण ते करत नाहीत. म्हणून मनसेला ते काम करावे लागते. एवढी मराठी माणसाच्या आणि मुंबईकरांच्या, ठाणेकरांच्या हिताची भूमिका घेऊनही आम्हाला मते मिळत नाहीत अशी खंत राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.

लोकशाहीमध्ये पक्षाच्या धोरणाचं आणि कामाचं मुल्यमापन हे निवडणुकीच्या माध्यमातूनच होत असतं. मनसेचा एवढा कामाचा दावा असेल तर त्यांना गेल्या काही निवडणुकीत अपेक्षीत यश आलं नाही. त्यामुळे मनसेने आपल्या ध्येय धोरणांचे, पक्षकार्याचे गांभीर्याने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. खरंतर मनसेला 2009 च्या निवडणुकीत तुलनेने भऱभरुन यश मिळालं होतं. मात्र ते त्यांना टिकवता आलं नाही.  यशचा चढता आलेख कमी का झाला याचा विचार करुन आणि चुका दुरुस्त करुन कामाला लागल्यास पुन्हा यश मिळू शकले यात शंका नाही.

COMMENTS