राजू शेट्टींनी घेतली राहुल गांधींची भेट, युपीएमध्ये सहभागी होणार ?

राजू शेट्टींनी घेतली राहुल गांधींची भेट, युपीएमध्ये सहभागी होणार ?

नवी दिल्ली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी राहुल गांधींची भेट घेतली आहे. दिल्लीमध्ये राजू शेट्टींनी  राहुल गांधींची भेट घेतली असून त्यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. राहुल गांधी आणि राजू शेट्टी यांच्या भेटीमुळे एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी आता युपीएमध्ये सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान यापूर्वी शेतक-यांच्या मुद्द्यावरुन राजू शेट्टी यांनी अनेकवेळा भाजप सरकारवर जोरदारी टीका करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता शेट्टी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतली असल्यामुळे ते काँग्रेसमध्ये सामिल होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजू शेट्टी जर युपीएमध्ये सहभागी झाले तर आगामी निवडणुकीत एनडीए सरकारच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत आहे.

 

 

COMMENTS