पुणे – ऊसाची थकीत एफआरपी रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना 29 जूनला मोर्चा काढणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पुण्यातल्या साखर आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत शेतकऱ्याचे पैसे दिले पाहिजे नाही तर त्यावर व्याज द्यावं असं कायदा सांगतो, मात्र अनेकवेळा हे होत नसल्याचं दिसून आलं असून त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच आता जर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली तर ते यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचंही यावेळी राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एफआरपी रक्कम देण्याबाबत राजू शेट्टी यांच्याकडून काढल्या जाणा-या मोर्चाकडे आता लक्ष लागलं असून या मोर्चानंतर तरी या शेतक-यांना न्याय मिळणार का? असा सवाल आता शेतकरी करत आहेत.
COMMENTS