बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांवर गदा आणणार्‍यांना उद्ध्वस्त करू – शरद पवार

बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांवर गदा आणणार्‍यांना उद्ध्वस्त करू – शरद पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा संविधान बाचावचा नारा देत भाजप सरकार आणि आरएसएसवर टीका केली आहे. मागील चार वर्ष आपण बघतोय या देशात गरीब, दलित, आदिवासी, मुस्लिम जनतेवर अन्याय सुरू आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे त्या विचाराचे लोक हातात मांस घेऊन जातो म्हणून त्याची हत्या केली जात आहे. परंतु राज्यकर्त्यांना त्याची चिंता नाही कारण या लोकांना संविधान नको असल्याची जोरदार टीका शरद पवार यांनी केली आहे. तसेच गोध्रा हत्याकांडात दोषी लोकांवर कारवाई करायचे सोडून संपूर्ण गुजरातमध्ये दंगल पोचवण्याचं काम केलं गेलं असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच संविधान वाचवू पण बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांवर गदा आणणार्‍यांना उद्ध्वस्त करू असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला आहे.  ही लढाई सोपी नाही पण ती आपल्याला लढायची असून राष्ट्रवादीने या देशात संविधान बचावचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याचा मला आनंद असल्याचंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

दरम्यान भारतीय संविधान या देशातील नागरीकांचा आधार आहे. आपल्या बाजूच्या पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशात अनेकदा संविधान आणि देशाचा कारभार करण्याची पद्धती बदलली. परंतु आपण आपल्या देशात तसा प्रयत्न झाला तर तळातील गरीब माणूस पेटून उठतो. इंदिरा गांधींसारख्या जबरदस्त नेत्याचा पराभव या देशातील जनतेनं केला. आणीबाणीचा विचार घेतला तर लोकांनी इंदिरा गांधींना बाजूला केलं. तसेच हे सगळं घडत होतं तेव्हा त्या राज्याचं नेतृत्व नरेंद्र मोदींकडे होतं, आज त्यांच्याकडे देशाचं नेतृत्व आहे. त्यामुळे आज देशात परिवर्तनाची गरज  असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच आपण महिला धोरण आणले त्याबाबत वेळोवेळी निर्णय घेतले. मात्र या सरकारने महिला धोरणाकडे दुर्लक्ष केलं. आपण महिलांना अधिकार दिले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं. या निर्णयामुळे महिलांचे नेतृत्व आज पुढे आलेलं दिसत आहे. तसेच कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नाही, संधी मिळाली तर महिला कर्तृत्व सिद्ध करतात.

 

आरएसएसच्या मनात संविधानाबद्दल आसुया

 ज्या घटनेनं आपल्याला अधिकार दिला त्या घटनेबद्दल आजच्या राजकर्त्यांना आदर राहिलेला नाही. भाजपाची मूळ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनात बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेबद्दल आसूया आहे. घटनेवर प्रेम असल्याचे वक्तव्य करतात पण ती धांदात खोटी आहेत.  नव्या पिढीसमोर घटनेबद्दल आशंका निर्माण करण्याचं काम ही संघटना करत आहे.

हेगडे यांचं संविधानाबाबत विधान आल्यानंतर ते त्यांचं वैयक्तिक विधान असल्याचं सांगितलं गेलं. गोळवलकरा़नी बंचेस ऑफ थॉट हे एक पुस्तक लिहलं आहे.  त्यात ते म्हणतात – जगातील अनेक देशातील उचललेली ही घटना आहे, ती परदेशी विचारांवर अवलंबून असलेली आहे, ती आपली आहे असे समजण्यासारखे नाही.  याच गोळवलकरा़च्या विचारावर मोदी सरकार चालले असल्याची जोरदार टीकाही यावेळी पवार यांनी केली आहे.

COMMENTS