नवी दिल्ली – राज्यसभेसाठी एकूण 59 जागांसाठी निवडणूक होती. त्यापैकी 33 जागा बिनविरोध निवडून आल्या असून उरलेल्या 26 जागांव मतदान सुरु आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानला सुरुवात झाली असून दुपारी चार वाजेपर्यंत आमदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तर संध्याकाळी पाच वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगाणा आणि केरळ या राज्यांमध्ये मतनाद सुरु आहे.
राज्यसभा निवडणुकीची प्रत्येक राज्यातील स्थिती !
महाराष्ट्र –
महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक होती. ती बिनविरोध झाली आहे. महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून जात आहेत.
बिहार – इथे सहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. दोन जेडीयू, एक भाजप, दोन आरजेडी आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला.
Voting underway at #Chhattisgarh Legislative Assembly in Raipur for one #RajyaSabha seat from the state pic.twitter.com/zOPhUvXZBP
— ANI (@ANI) March 23, 2018
आंध्र प्रदेश – आंध्र प्रदेशात तीन जागांसाठी निवडणूक होती. तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. ज्यामध्ये दोन टीडीपी आणि एक वायएसआरचा उमेदवार आहे.
#Visuals from Telangana assembly ahead of voting for three #RajyaSabha seats from the state pic.twitter.com/Uh3atyBHil
— ANI (@ANI) March 23, 2018
छत्तीसगड – एका जागेसाठी निवडणूक होती. भाजपचे सरोज पांडे बिनविरोध निवडून आले.
गुजरात – गुजरातमध्ये चार जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. यामध्ये दोन काँग्रेसचे, तर दोन भाजपचे खासदार आहेत.
हिमाचल प्रदेश – एकाच जागेसाठी निवडणूक होती आणि जेपी नड्डा यांची बिनविरोध निवड झाली.
Kolkata: MLAs queue up at the state assembly to cast their votes for #RajyaSabhaElections, 5 seats are being contested from West Bengal. pic.twitter.com/ODHVpYYHPW
— ANI (@ANI) March 23, 2018
हरियाणा – भाजपच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली.
मध्य प्रदेश – मध्य प्रदेशात राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होती. यामध्ये केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याशिवाय तीन इतर उमेदवार अजय प्रताप सिंह, कैलाश सोनी आणि राजमणी पटेल यांची बिनविरोध निवड झाली.
देहरादून – उत्तराखंडमधील एका जागेवरही बिनविरोध निवडणूक झाली. भाजपचे अनिल बलूनी खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेले.
Lucknow: Visuals from Uttar Pradesh Assembly; CM Yogi Adityanath meets party MLAs, Deputy CM Dinesh Sharma also present. #RajyaSabhaElections pic.twitter.com/DwSfe53Aqj
— ANI UP (@ANINewsUP) March 23, 2018
ओदिशा – तीन जागांवर बिनविरोध निवडणूक झाली. बीजेडीचे तीन उमेदवार निवडून आले.
राजस्थान – राज्यसभेच्या तीन जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे भूपेंद्र यादव, मदनलाल सैनी आणि डॉक्टर किरोडी लाल यांची बिनविरोध निवड झाली.
एकूणच सुरु असलेल्या या निवडणुकीच्या मतमोजणीला पाच वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे मतदानानंतर मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS