मुंबई – कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत शनिवारी सामनाच्या आग्रलेखात शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारत बंद, राष्ट्रपती भेट, दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेले पत्र अशा अनेक गोष्टी विरोधकांकडून करण्यात आल्या आहेत. पण ‘मरतुकड्या’ विरोधकांमुळे सत्ताधारी मोदी सरकारवर म्हणावा तसा दबाव येत नसल्याची भूमिका सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. त्यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?”, असा सवाल यांनी केला आहे.
“आजच्या सामनाच्या अग्रलेखात देशातील विरोधी पक्षावर टीका करण्यात आली आहे. सध्याचा घडीला विरोधी पक्षातील नेते कमकुवत आहेत. केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सक्रिय आहेत आणि बाकीचे नेते निष्क्रिय झाले असल्याची टीका केली आहे. यावर महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत आहे. सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार?”, असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.
COMMENTS