सांगली आणि जळगाव महापालिकेचे काल निकाल लागले. त्यावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. भाजप समर्थक याला लोकांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे असं सांगत आहेत. तर विरोधक एव्हीचा घोटाळा आहे असं म्हणत आहेत. राज्यातील ज्येष्ठ कवी आणि वात्रटटिकाकार रामदास फुटाणे यांनी आपल्या खास शैलीत या विजयाचं वर्णन केलं आहे.
सांगली
सहकाराच्या बैलजोडीवर
‘भगवी’ झूल टाकली
महापालिकेच्या दिशेने
नवी गाडी हाकली
कायापालट
चाळीस वर्षानंतर
यांचा नंबर आला
जळगावचा ‘श्वेतांबर’
‘दिगंबर’ झाला.
रामदास फुटाणे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2016518331923357&id=100006956280222
COMMENTS